मुंबई : 'शक्तीमान' आणि जुन्या म्हणजेच १९८८ मधील बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत 'गंगापुत्र भीष्म पितामह' या अतिशय गायलेल्या भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरुन निर्माती एकता कपूरवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८ मध्ये 'कहानी हमारे महाभारत की', या महाभारताच्या नव्या रुपास साकारत असताना एकता कपूरने जणू या 'महाभारता'ची हत्याच केली असा आरोप त्यांनी केला. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलं. 'महाभारताचं नवं रुप साकारत असताना एकता म्हणाली होती की ती हे महाभारत मॉडर्न प्रेक्षकांसाठी साकारत आहे. संस्कृती कधीच मॉडर्न (आधुनिकतेकडे झुकणारी) होऊ शकत नाही. जेव्हा ती मॉडर्न होईल तेव्हा ती संपलेली असेल', असं ते म्हणाले. यावेळी त्याने एकताची निर्मिती असणाऱ्य महाभारतामध्ये द्रौपदीच्या खांद्यावर चक्क टॅट्टू असण्याची बाबही अधोरेखित केली. 


'क्यों की ग्रीक भी कभी हिंदुस्तानी थे अशा प्रकारची कोणती मालिका साकारण्यात आली असती तर मी एकताच्या मालिकेचा स्वीकारही केला असता. पण, तिला या महाकाव्याची हत्या करण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांनी देवव्रताच्या भीष्म प्रतिज्ञेचंच स्वरुप बदललं. एका विचित्र रुपात सत्यवतीला सादर केलं. शिवाय मालिकेत इतरही काही गोष्टी बदलल्या. खुद्द वेद ऋषी व्यासांहून अधिक बुद्धिचातुर्य दाखवण्याचा त्यांनी इथे प्रयत्न केला, ज्यावर माझा आक्षेप आहे', असं म्हणत रामायण आणि महाभारत या फक्त पुराणकथा नसून हा इतिहासच आहे असं ठाम मत त्यांनी मांडलं. 


 


Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात अनेक जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहे. ज्यामध्ये बी.आर. चोप्रा यांचं 'महाभारत', रामानंद सागर यांचं 'रामायण' याशिवाय 'शक्तीमान', 'देख भाई देख', 'श्रीमान श्रीमती' अशा दूरदर्शनवरील खास मालिकांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे टीआरपीच्या बाबतीच या मालिकांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अनेक मालिकांना मागे टाकत असल्याचंही या काळात सिद्ध झालं आहे.