मुंबई : आमिर खानसोबत सिनेमातील दिसलेल्या या अभिनेत्रीवर वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक अत्याचार झाला होता. आता या अभिनेत्रीने #MeToo च्या अंतर्गत आपलं दुःख शेअर केलं आहे. बॉलिवूड अभिनेता आमीर खानसोबत 'मन' या सिनेमात दिसणाऱ्या अभिनेत्रीलवर लहानपणी लैंगिक अत्याचार झाला आहे. फिल्म जगतात या दिवसांत #MeToo चं कॅम्पेन सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामध्ये अभिनेत्री आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. या आरोपांतर्गत अनेक बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी समोर आली आहेत. बॉलिवूड लाइफला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शमाने आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळातील गोष्ट शेअर केली आहे. 14 वर्षांची असताना एका दिग्दर्शकाने माझ्या मांड्यावर हात लावला होता. 


त्यानंतर मी दिग्दर्शकाला विरोध केला. तेव्हा त्या दिग्दर्शकाने मला सांगितलं की, तुला कुणीच सोडणार नाही. मग तो दिग्दर्शक असो वा अभिनेता किंवा प्रोड्युसर. तुम्हाला प्रगती करायची असेल तर असं होणारच त्याशिवाय तू प्रगती करूच शकत नाही. शमा सिंकदरने ही गोष्ट शेअर करत सांगितलं की, मी या घटनेने खूप घाबरले. मुलाखतीत शमाने आलोकनाथ यांच्यावर देखील वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली की, माझ्यासाठी हे खूप शॉकिंग होतं. मी कधी आलोकनाथसोबत कधी काम केलं नाही. पण त्यांना मी चांगला माणूस समजत होते.