मुंबई : रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे पुण्याची सुनबाई झाली आहे. झी मराठीचा कार्यक्रम 'सारेगमप'मधून ओळख मिळालेली कोकणकन्या शमिका विवाहबंधनात अडककली. शमिका आणि गौरव कोरगावकरचा साखरपुडा ९ मे २०१९ रोजी रत्नागिरीमध्ये दिमाखात झाला होता. शमिका आणि गौरव याचा विवाह  ६ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे तिच्या माहेरगावी थाटामाटात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शमिका हिच्या विवाह सोहळ्याला संगीतक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. शमिका ही "झी-सारेगमप"मधून प्रकाशझोतात आली. म्युझिक अरेंजर-प्रोड्युसर अशी संगीतक्षेत्रात ओळख असणारा गौरव कोरगावकर हा पुण्याचा आहे. सुमधुर स्वरांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारी शमिका भिडे आता पुण्याची सुनबाई झाली आहे.  


 गौरव हा फर्जंद चित्रपट, दिल दोस्ती दुनियादारीचा कॉन्सर्ट, तसेच झी-मराठी मराठीवरील सिरियल्ससाठीही गौरव बॅकग्राऊंडमध्ये काम पहातो. तसेच तो वेगवेगळ्या जिंगल्स, जाहिरातीसाठी संगीत दिले आहे. उत्तम म्युझिशियन्स म्हणून गौरवची ओळख आहे. उभयंतास खूप साऱ्या शुभेच्छा!