मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. बिग बॉसनंतर अभिनेत्री आणि तिचा बॉयफ्रेंड राकेश बापट यांची एकच चर्चा सुरु आहे. ज्यानंतर आता प्रत्येकजण या दोघांच्या लग्नाची वाट पाहात आहेत. शमिता आणि राकेशचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा राकेश आणि शमिताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शमिता खूप नाराज दिसत आहे. शमिता शेट्टी तिचा बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत रात्री उशिरा पार्टीला गेली होती. पार्टीनंतर जेव्हा शमिता बाहेर आली, तेव्हा सर्व पापाराझी तिचे फोटो क्लिक करण्यासाठी उभे राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत शमिता सुरुवातीला थोडी नाराज दिसली, पण तिने पापाराझींसाठी पोज दिली आणि राकेश बापटसोबत फोटो काढाले. परंतु त्या दरम्यान एक गोष्ट सगळ्यांना खटकली.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी शमिता शेट्टी फोटो काढायला तयार नसते. ज्यानंतर राकेश बापटसोबत ती पोज देते. त्या वेळेला त्यांच्या बाजूला नेहा बसिन येऊन उभी राहिली. तेवढ्यात राकेशने त्याचा मित्र आणि मराठी अभिनेता वैभव तत्ववादी याला देखील बोलावले. परंतु जेव्हा तो फोटो काढण्यासाठी त्यांच्या बाजूला उभा राहिला, तेव्हा मात्र शमिताने त्याचेकडे दुर्लक्ष करत तेथून निघून गेली. ज्यामुळे पॅपराझींना वैभवचा एकही फोटो घेता आला नाही.


शमिताचं हे वागणं सगळ्यांनाच दिसून आलं, जे सगळ्यांना खटलं. या कारणामुळे शमिता ट्रोल देखील होऊ लागली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शमिता का रागावली?


खरं तर, शमिता शेट्टीला तेथून निघून जायचं होतं, परंतु तिची कार न आल्यामुळे ती थोडी रागावलेली दिसत होती. मात्र, गाडी मिळताच ती घाईघाईने गाडीत बसली आणि राकेश बापटसोबत तेथून निघून गेली.


शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी 'बिग बॉस ओटीटी'वर अनेकांची मने जिंकली. परंतु या शोनंतर देखील यांच्या जोडीवर लोकं प्रेम करु लागले. या दोघांच्या ब्रेकअपची अफवा पसरली होती, परंतु नंतर या दोघांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले होते.