मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या तुफान चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योपती राज कुंद्राच्या अटकेनंतर  शमिता सतत चर्चेत आहे. आता शमिता चर्चेत तर आली आहे पण यावेळी कारण  जरा वेगळं आहे. शमिताने 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) मध्ये एन्ट्री केली आहे. तिच्या धमाकेदार एन्ट्रीमुळे सर्वत्र फक्त तिच्या नावाची चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीची बहिण शमिता शेट्टी टीव्हीवरील प्रसिद्ध  शो  ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ चा भाग आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमिताने शोच्या ग्रँड प्रिमियरमध्ये कंटेस्टेंट म्हणून एन्ट्री केली आहे. तिने 'शरारा शरारा' गाण्यावर धमाकेदार डान्स करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर शमिताला ट्रोल केलं जात आहे.  ‘बिग बॉस ओटीटी’  दिग्दर्शक करण जोहर होस्ट करत आहे. सुरूवातीला करण जोहरने जोरात एन्ट्री केली. 



शिवाय फक्त शमिताने नाही तर अभिनेत्री मलायका  अरोराने देखील भन्नाट डान्स केला. बिग बॉस सर्वप्रथम वूट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, त्यानंतर टीव्हीवर  प्रेक्षकांना शोचा आनंद घेता येणार आहे.