मुंबई : अभिनेता संजय कपूरची मुलगी संजय कपूर (Sanjay Kapoor) ची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता देखील शनायाने बेली डान्स करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने केलेला बेली डान्स अत्यंत हॉट आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



शनाया कपूर हा बेली डान्स पाहून तुमच्या पोटात देखील नक्कीचं दुखेल. शनाया लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. आता पुन्हा सोशल मीडियावर घराणेशाहीमुळे वाद पेटला आहे. त्याला कारणही तसचं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने कपूर कुटुंबातील  मुलगी शनाया कपूरसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडे करून दिले आहेत.


 


शनाया कपूरच्या आधी करणने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे या स्टारकिडला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. असं देखील कळतं आहे की, करण खूशी कपूर आणि अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानला देखील लाँच करणार असल्याची चर्चा आहे.