Sharad Kelkar : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा गेल्या दोन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्याच्या अभिनयानं शरदनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. इतकंच काय तर शरद केळकरनं आजवर अनेक चित्रपटांसाठी डबिंग केले आहे. चित्रपटाच्या कलाकारासाठी दमदार आवाज हवा असेल तर लगेच सगळ्यांसमोर येते तो शरद केळकर. फक्त अभिनयात नाही तर डबिंगमध्येही त्यानं चांगली कामगिरी केली आहे. सध्या शरद हा त्याच्या 'दसरा' या चित्रपटातील अभिनेता नानीच्या आवाजाची डबिंग केली आहे. तर लवकरच शरद केळकच्या आवाजात राम आपल्याला आदिपुरुष या चित्रपटातून येणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न असेल की आदिपुरुषमध्ये तर प्रभास रामाची भूमिका साकरणार आहे, मग शरद केळकर कसा? शरद केळकर प्रभासची भूमिका प्रभू रामसाठी डबिंग करणार आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शरद केळकरणं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलिंग डेविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरदनं नुकतीच सिद्धार्थ कन्ननला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शरदनं स्ट्रगलिंडच्या दिवसाविषयी सांगितलं. 'मी जेव्हा मुंबईत आलो होतो तेव्हा मी अडखळत बोलायचो. त्यात अभिनय कसा करतात हे मला माहित नव्हतं आणि माझ्याकडे पैसे किंवा मग घर देखील नव्हतं. त्या काळानं मला शिकवलं की जोपर्यंत मला काम मिळत नाही तो पर्यंत मला खूप मेहनत करायची आहे. हा काळ म्हणजे 2003-04 होता. मग मी सगळ्यात पहिले केलेली मालिका म्हणजे 'सिंदूर तेरे नाम का' आहे. माझी जीभ जड होती त्यामुळे मी बोलताना अडखळायचो आणि त्यातून कसं बाहेर पडायला हवं हे मला कळत नव्हतं. मला छोट्या पडद्यावर काम करायचे नव्हते आणि त्याकाळात माझी पत्नी देखील काम करत नव्हती, मला फक्त मोठ्या पडद्यावर काम करायचे होते,' असं शरद म्हणाला. 



पुढे शदर म्हणाला, त्याकाळात माझी आर्थिक स्थिती खूप खराब होती. आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जाताना देखील विचार करावा लागत होता. तर एकवेळी अशी होती जेव्हा मला वाटलं की मी आता बाबा होणार आहे तर मी टीव्ही सोडणं योग्य आहे का? पण त्या गोष्टीला मी चांगल्या प्रकारे घेतले आणि त्याचा रिझल्ट आता समोर आहे. 12 वर्षांपूर्वी मला अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे खूप राग आला होता. पण तो राग कधी बाहेर पडला नाही. मी कधी कोणावर हाथ उगारला नाही पण मला खूप राग यायचा. 


हेही वाचा : किंग्स चार्ल्स III यांच्या क्राउन सेरेमनीमध्ये Sonam Kapoor लावणार हजेरी!


शरद केळकर म्हणाले, 'माझ्या रागाचा माझ्या कामावर कधीच परिणाम झाला नाही, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला. सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर, यामुळे माझ्या हाताला 150 टाके पडले आणि शस्त्रक्रिया करावी लागली. ही एक मोठी घटना होती, रागाच्या भरात काचेवर मी जोरात हाथ आपटा आणि काच पूर्णपणे तुटला. किर्तीने जेव्हा हे पाहिले तेव्हा ती खूप घाबरली. मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तिला बाहेर रडताना पाहिले. याचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि मी शांत होण्याचा निर्णय घेतला. तिनं मला सांगितले की मला पाहून ती किती घाबरली होती.