मुंबई :  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार याचं दीर्घ आजाराने बुधवारी निधन झालं. त्याच्या मृत्यूनंतर फक्त बॉलिवूडलाचं नाही तर राजकीय विश्वाला देखील मोठा धक्का बसला आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दिलीप कुमार यांच्यासोबत अनुभवलेले क्षण पुन्हा एकदा ताजे केले. आमचं एक वेगळेचं नातं होतं. असं म्हणत शरद पवार यांनी दिलीप कुमार यांनी श्रद्धांजली वाहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार म्हणाले 'जेव्हा आम्हाला कळालं की दिलीप कुमार चित्रीकरणासाठी पुण्यात आले आहेत. तेव्हा आम्ही त्यांना पाहायला सायकलवरून गेलो. त्याठिकाणी  दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर विधीमंडळात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांचं आणि माझं  एक वेगळं नातं निर्माण झालं.'



शरद पवार यांनी भारतीय  सैन्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी  जे कार्य केलं त्याबद्दल देखील सांगितलं, 'दिलीप कुमार यांनी भारत पाकिस्तान, भारत-चीन युद्धांदरम्यान भारतीय  सैन्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम पुढाकार घेतला. आम्ही परदेशात अनेक ठिकाणी एकत्र गेलो. तेव्हा त्यांना पाहाण्यासाठी लोक गर्दी करायचे. '


'काही दिवसांपूर्वीचं त्यांना भेटून आलो. पण मी माझ्या जवळच्या स्नेहाला मुकलो' असं देखील शरद पवार म्हणाले. दिलीप कुमार यांना दीर्घकाळापासून बाइलेटरल प्लूरल इफ्यूजन ही समस्या होती.