करण जोहरकडून सगळ्यांसमोर आलियावरील प्रेम व्यक्त
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चित्रपट निर्माता करण जोहरच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चित्रपट निर्माता करण जोहरच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने करणच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि तेव्हापासून आजपर्यंत तिने तिच्या मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर जे काही मिळवलं ते कौतुकास्पद आहे. करण जोहर आता आलिया भट्टसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे. दरम्यान, करणने आलियावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आलियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात आलिया भट्ट रानीची भूमिका साकारत आहे. तर रणवीर सिंग रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरने आलिया भट्टसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये आलिया भट्टने केशरी रंगाचा टॉप घातला आहे आणि तिच्यासोबत जॅकेट परिधान केलं आहे.
दुसरीकडे करण जौहरदेखील ग्रे कलरच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. करणने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये शेअर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करणने आलियासाठी लिहीलं की, "मेरी रानी के लिए शुद्ध प्यार"
करण जोहर सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असतो. तो कायम आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. त्याचे फोटो फँन्सच्या पसंतीस येतात. आणि कमेंट देखील करतात. करण जोहर आज रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाची रिलीज डेट देखील जाहिर करणार आहे.