Shark Tank India 2 : यशस्वी व्हायची इच्छा कुणाची नसते? त्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीनं प्रयत्नही करतात. पण, प्रत्येक वेळी त्या प्रयत्नांना यश मिळतंच असं नाही. हा ज्याच्यात्याच्या नशिबाचा भाग. पण, नशिब पालटण्याची ताकदही अनेकांमध्ये असते ही बाब नाकारता येणार नाही. Shark Tank India 2 या रिअॅलिटी शोमध्ये नुकत्याच आलेल्या एका स्पर्धकानं हेच सिद्ध केलं आहे. नवनवीन संकल्पनांच्या बळावर नावारुपास आलेल्या आणि व्यवसाय क्षेत्रात स्वत:ची ओळख प्रस्थापित करु पाहणाऱ्या अनेकांसाठी हा शो म्हणजे हक्काचं व्यासपीठ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात नुकताच एक असा व्यावसायिक (Businessman) आला ज्याच्या आत्मविश्वासानं आणि किमान वयात कमाल नफा आणि कमाल यश मिळवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास परीक्षकांच्या जागेवर असणाऱ्या 'शार्क्स'नाही थक्क करून गेला. सोशल मीडियावर याच भगाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. जिथं शार्क्ससमोर अवघ्या 18 वर्षांचा एक entrepreneur येतो. 


शाळेत जाण्यच्या वयात त्यानं सुरु केला व्यवसाय....


व्हिडीओमध्ये स्वत:ची ओळख सांगताना हा मुलगा / स्पर्धक स्वत:विषयी माहिती सांगतो आणि समोर बसलेल्या प्रत्येकाच्याच भुवया उंचावतात. या मुलानं 8 व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. त्याचीचित्रकला इतकी सुरेख होती की, त्यानं चित्र विकून दर महिन्याला जवळपास 9 हजार रुपये कमवले होते. पुढे व्यवसाय वाढला. इयत्ता सातवीमध्ये या मुलानं (Stock Market) स्टॉक मार्केटमध्ये इंटर्नशिप केली, ज्यानंतर त्यानं इतरांना कर्जाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच त्यानं 18 वर्ष पूर्ण केली. दहावीनंतर त्यानं शिक्षण सोडलं आणि पूर्णवेळ व्यवसायालाच वाहून घेण्याचा निर्णय घेतला. 


हेसुद्धा वाचा : Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral


 



नमिता थापर (Namita thapar), अनुपम मित्तल (anupam Mittal), अमित जैन (Amit Jain), पीयूष बंसल (Piyush Bansal) आणि विनीता सिंह (Vinita singh) यांनाही या मुलाच्या प्रवासावर विश्वासच बसेना. जिथं शालेय आयुष्यात असताना आपण किती चांगले मार्क मिळवू शकतो, कसे पुढे जाऊ शकतो असाच विचार अनेकजण करतात. पण, या मुलानं मात्र मोठ्या धाडसानं व्यवसाय क्षेत्रात स्वत:ला असंकाही झोकून दिलं की फार कमी वयातच आपल्याला भविष्यात नेमकं काय हवं आहे याबाबतचं चित्र त्याच्यापुढे स्पष्ट झालं होतं. कमाल आहे ना?