लव्हमॅरेज केलेल्या `या` अभिनेत्रीचा 10 वर्षांचा संसार मोडला
शेअर केली मनातील भावना
मुंबई : मराठी सेलिब्रिटींची लग्न आणि त्यांचे घटस्फोट हे कायमच चर्चेचा विषय असतात. अगदी लव्हमॅरेजकरूनही अनेक कलाकारांची लग्न मोडताना दिसत आहेत. असंच काहीस घडलं आहे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसोबत. लव्हमॅरेज केलेल्या शर्मिष्ठा राऊतचा 10 वर्षांचा संसार मोडला आहे. आणि याची कबुली तिने एका रिअॅलिटी शोमध्ये दिली आहे.
शर्मिष्ठाचे लग्न अमेय निपाणकर नावाच्या तरूणासोबत लग्न केले होते. अमेयसोबत शर्मिष्ठाचे लव्हमॅरेज होते. हा विवाह घरच्यांच्या परवानगीने झाला होता. मात्र आयुष्यात काही निर्णय चुकतात तसा लग्नाचा निर्णय चुकल्याचं तिने मान्य केलं आहे. जानेवारी महिन्यातच शर्मिष्ठाचा घटस्फोट झाला आहे. आणि आता ती एका मानसिक तणावातून जात असल्याच सांगितलं जातं आहे.
२२ एप्रिल १९८४ साली तिचा जन्म ठाणे येथे झाला. सरस्वती विद्यामंदिर ठाणे येथून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे वडिलांच्या व्यवसायामुळे नाशिकला हे कुटुंब स्थलांतर झाले. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले असून नाशिक मधूनच तिने आपले बी कॉम चे शिक्षण पूर्ण केले आहे. सातवी इयत्तेत असताना तिने नाटकांमध्येदेखील सहभाग दर्शविला आणि तेव्हापासूनच या क्षेत्रात तिने यायचे ठरवले. प्रसिद्ध स्वप्नगंधा थेटर ग्रुप चा ती एक भाग आहे.
स्टार प्रवाह वरील’ मन उधाण वाऱ्याचे ‘मधील तिने साकारलेली नीरजा ची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या तितकीच संस्मरनिय ठरली. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी ‘ ही मालिकाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली आहे. झी मराठीवरील आणखी एक मालिका ‘ उंच माझा झोका ‘ या मालिकेत तिने ताई काकू या व्यक्तिरेखा उत्तम साकारल्या. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या तिच्या अभिनित केलेल्या काही मालिका.
मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने उत्तम कामगिरी बजावली. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. २०१२ साली बेस्ट ऍक्टरेस म्हणून म टा सन्मानाने तिला गौरविण्यात आले आहे. दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली. एक पेक्षा एक, फु बाई फु, कॉमेडी एक्सप्रेस या रिऍलिटी शोमध्ये देखील तिने पार्टीसिपेट केले आहे.