शशांक केतकरने शेअर केला मुलाचा पहिला फोटो आणि नाव
`पाहिले न मी तुला` मालिकेतून शशांक प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच मनं जिकलं आहे. चाहते शशांकला त्याच्या रिल आणि रिअल लाईफमध्ये फॉलो करत असतात. शशांकने काही दिवसांपूर्वीच आपण बाबा झाल्याची गोड बातमी शेअर (Shashank Ketkar shared his son name and first pictire) केली होती. शशांकची पत्नी प्रियंकाने गोंडस मुलाला जन्म दिला होता.
25 डिसेंबरला शशांकने पत्नी प्रियांका प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी दिली होती. ख्रिसमसच्या दिवसांत आपल्याकडे सांताक्लॉज येणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. पत्नी प्रियांकाबरोबरचा एक Cute फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. प्रियांका-शशांकच्या या आनंदी फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता शशांकने आपल्या गोंडस मुलाचा फोटो शेअर करत त्याचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.
'ऋग्वेद शशांक केतकर'; असं या गोंडस मुलाचं नाव असून त्याचा फोटो शेअर केला आहे. शशांकने हातात घेतलेल्या आपल्या बाळाच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा हार्ट शेपचा इमोजी लावला आहे. यामुळे बाळाचा चेहरा दिसत नाही. हिरव्या रंगाच्या टोपऱ्यातलं बाळं आणि शशांक खूप छान दिसत आहेत.
बाप आणि मुलगा यांच्यातील हे खास नातं आणि त्या नात्याचा आनंद शशांकच्या चेहऱ्यावर पाहता येत आहे. शशांकने नुकताच हा फोटो इंस्टाग्रावर पोस्ट केला आहे. याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीने यासारखा दुसरा आनंद नाही म्हणतं शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांक त्याच्या सोशल मीडियावर नेहमी प्रियांकाबरोबरचे फोटो शेअर करत असतो. 2017 मध्ये प्रियांका आणि शशांक यांनी विवाह केला होता. याआधीही या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, दरम्यान हा फोटो देखील अनेक चाहत्यांनी शेअर केला आहे.
कामाबद्दल बोलायचं झालं तर 'झी मराठी'वर शशांकची नवी मालिका 'पाहिले न मी तुला' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'होणार सून मी या घरची', 'हे मन बावरे' या मालिकांमधून शशांक हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. आता शशांकही 'Fathers Club' मध्ये असणार आहे. याआधी अभिनेता आरोह वेलणकर याने देखील बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे.