Shatrughan Sinha on Zaheer Iqbal Sonakshi Sinha Interfaith Marriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Shatrughan Sinha) अखेर आपल्या नात्याला विवाहबंधनात अडकवलंय. सोनाक्षीने (Sonakshi Sinha) मुस्लीम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) नोंदणी पद्धतीने लग्न केलंय. लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरसोबत लग्न करणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्ह या लग्नावरुन नाराज आहेत, असं बोलं जातं होतं. पण लग्नाला वडील आणि आईने हजेरी लावली. पण मुलांच्या सुखासाठी आपण त्यांचा सोबत आहोत, असं म्हटलं होतं. पण दुसरीकडे या लग्नात सोनाक्षीचा भाऊ ( luv sinha) आणि शत्रुघ्न यांचा मुलगा लव्ह उपस्थितीत नव्हता. एकुलत्या एक बहिणीच्या लग्नात भावाची गैरहजरी सगळ्यांच आणि खास करुन चाहत्यांना खटकली. या लग्नाला दोन आठवडा होईल आता पण हे कुटुंब आजही चर्चेत आहे.  


'कुटुंबात मतभेद...'


या लग्नावरून सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्यात. लवच लग्न न येणं आणि या टीकांवरुन नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, याला बदनाम करण्याचे षडयंत्र म्हटलंय. ही माझ्या कुटुंबाविरुद्ध बदनामीची दुर्भावनापूर्ण मोहीम म्हटलंय. 



ते म्हणाले की, त्यांनी अनेक मोठी संकटे पाहिली आहेत आणि हे काहीच नव्हते. शिवाय कोणत्या कुटुंबात मतभेद नसतात. काळजी करण्यासारखं काही नव्हतं. आम्ही कोणत्याही सामान्य कुटुंबासारखे आहोत. त्यांच्या घरात लग्न होतात तशी आमच्या घरात होतात. मात्र आमची इतकी चर्चा का झाली. 



शत्रुघ्न पुढे म्हणाले की, हे पहिल्यांदा नाही झालं आहे. अशी लग्न होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत बदनामीकारक मोहिमेला सामोरं जावं लागलं. ते पुढे असंही म्हणालेत की, मी माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले सहन करणार नाही, कोणत्या कुटुंबात मतभेद होत नाहीत. काही मुद्द्यांवर कुटुंबात असहमत असू शकतो किंवा नाराजी असू शकते. मात्र शेवटी आमचं सर्व कुटुंब एक आहे. त्यामुळे आमचं कुटुंब कोणीही तोडण्याचा प्रयत्न करु नका.