Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : हीरामंडीला तुफान प्रसिद्ध मिळाल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड झहीर इक्बाल खानसोबत ती लग्न करणार आहे अशी चर्चा रंगली आहे. येत्या 23 जूनला मुंबईत ती विवाहबद्ध होणार आहे, असं एका मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जातंय. झहीर आणि सोनाक्षी गेल्या एक वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजयी झालेले खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना लेकीच्या लग्नाविषयी माहितीय आहे का? असा प्रश्नांचा भेडीमार होते आहे. लेकीच्या लग्नाबद्दल त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


लेकीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीत म्हणाले की, 'त्यांना सोनाक्षीच्या लग्नाबद्दल कुठलीही कल्पना किंवा माहिती नाही. शिवाय सोनाक्षीनेही अद्याप काही सांगितलं नाही. मी सध्या दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी लगेच दिल्लीला आलो. माझ्या मुलीच्या प्लॅन्सबद्दल मी कोणाशीही बोललो नाही. तर तुमचा प्रश्न आहे की सोनाक्षी लग्न करतेय का? तर मला याबद्दल तिने अजून काही सांगितलं नाही आहे.'



पुढे ते म्हणाले की, 'मला तेवढंच माहिती आहे, जेवढं मीडियामध्ये लिहिलं गेलं आहे किंवा बोललं जातंय. जर सोनाक्षीने आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं तर मी आणि माझी पत्नी तिला आशिर्वाद नक्की देऊ आणि त्यांच्या आनंदाची प्रार्थना करु.'


'सोनाक्षीच्या निर्णयावर...'


एवढंच नाही तर शत्रुघ्न सिन्हा असंही म्हणाले की, 'आमच्या मुलीच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ती कधीही असंवैधानिक किंवा बेकायदेशीर निर्णय घेणार नाही. ती अडल्ट असून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला खात्री आहे की, मला हे आवडेल. माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर मला लग्नाच्या मिरवणुकीमध्ये नाचायला आवडेल.'


या मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, 'माझ्या जवळचे लोक मला विचारत आहेत की मला याची माहिती का नाही, आणि मीडियाला याची माहिती आहे. यावर, मी एवढंच म्हणेल की, आजची मुलं त्यांच्या पालकांची संमती घेत नाहीत, फक्त त्यांना कळवा आणि आम्ही सूचना मिळण्याची वाट पाहत आहोत.'