Shatrughan Sinha's Son Luv On How do People Get Work in Bollywood Industry : बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचा मुलगा लवनं (Luv Sinha) बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रोजेक्ट्ससाठी ज्या लोकांना घेतात त्यांना काही येत नसते असा खुलासा केला आहे. लवनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हे वक्तव्य केलं आहे. यावेळी तो म्हणाला की त्याला हिंदी बोलता येत नाही किंवा अभिनय करता येत नाही तरी निर्माते त्याची  निवड करतील. शत्रुघ्न यांच्या मुलाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लव म्हणाला, मला इतर चित्रपटसृष्टींविषयी माहित नाही. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीत अशा कलाकारांना संधी देतात, ज्यांनी इतकी प्लास्टिक सर्जरी केली असते की ते  प्लास्टिकचे झालेले असतात. ते हिंदी बोलू शकत नाही, अभिनयही करू शकत नाही. तरी सुद्धा त्यांनाच संधी दिली जाते. लवची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 



लवचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी लवच्या या ट्वीटवर उत्तर देत म्हणाला, "मला खरोखर आशा आहे की 2023 मध्ये आमच्यासारख्या नवोदितांना संधी मिळेल,  ज्यांना भाषा येते आणि ज्यांच्यात स्किल्स चांगले आहेत, त्यांनाच हिंदी चित्रपटात काम मिळेल." दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, "बेटा, मेहनत लागते, तुझ्या वडिलांकडे बघ.. देव आनंद साहेबांनी त्यांची कशी ओळख करून दिली, मग त्यांनी कशा प्रकारे ग्रे शेड्सच्या भूमिका केल्या आणि शेवटी कालीचरण पाहायला मिळाले. ते कोणला घाबरत नव्हते आणि डॅशिंग होते."


हेही वाचा : चित्रपटसृष्टीपासून लांब तरी Malaika Arora महिन्याला कमावते इतके कोटी, आकडे ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का
 
लवनं 2010 साली ऋषी कपूर, हेमा मालिनी आणि रेखा यांच्यासोबत राज कंवर यांच्या 'सादियान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या सिक्वलची निर्मिती अनिल शर्मा करत आहेत. लवनं पुढे 2018 साली प्रदर्शित झालेल्या पलटन या चित्रपटात काम केले. 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित चित्रपटात काही सेकंदांसाठी दिसला होता. या चित्रपटात त्यांन लेफअ्टनंट अत्तार सिंगची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद आणि हर्षवर्धन राणे देखील होते.याशिवाय लव हा 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'गदर 2' या चित्रपटातही दिसणार आहे.