मुंबई : दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गिल यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. 'बिग बॉस'च्या घरात दोघांची ओळख झाली... त्यानंतर मैत्री... मैत्री दिवसागणिक आणखी घट्ट होत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चाहत्यांना देखील ही जोडी फार आवडली. दोघांच्या जोडीची चर्चा तुफान रंगली. दोघे लग्न कधी करणार? असा प्रश्न चाहत्यांकडून दोघांना विचारला जायचा....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण गेल्या वर्षी सिद्धार्थचं निधन झालं. त्याच्या निधनाने शहनाजसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण निधनानंतरही सिद्धार्थने शहनाजची साथ सोडलेली नाही. नुकताचं शहनाजला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. 



तेव्हा शहनाजच्या फोन मध्ये सिद्धार्थचा फोटो दिसला. फोटोमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजने एकमेकांचा हात धरला आहे. हा सध्या सोशल मीडियावर शहनाजचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.