मुंबई :  Bigg Boss 13 या रिअॅलिटी शोमधून प्रकारशोतात आलेल्या आणि पंजाबी चित्रपट जगतामध्ये कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलचा (shehnaaz gill) चाहता वर्ग बराच मोठा. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत असमणारी तिची खास मैत्री सर्वांनाच हेवा वाटण्याजोगी. त्याच्या निधनानंतर शहनाजच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. पण, आता मात्र ती या अडचणींवर मात करुन वाट पुढे चालताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाज गिल तिच्या करिअरमध्ये सतत पुढे जाताना दिसत आहे. अनेकवेळा ती तिच्या चाहत्यांसाठी भांडताना दिसली आणि अनेकवेळा अभिनेत्री सिद्धार्थ शुक्लासाठी भावूक झाल्याचंही दिसलं आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शहनाजने अॅटिट्यूड दाखवायला सुरुवात केल्याचं अनेकजणांच म्हणणं आहे. सगळ्यात आधी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा.


झाली ट्रोल
एमसी स्क्वेअरसोबत शहनाज तिच्या पहिल्या गाण्याचं प्रमोशन करत होती. पण यावेळी शहनाजचा टोन थोडा उद्धट झाल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. शहनाज म्हणू लागली की गाणं गा, हे लोक फक्त फोटो काढायला आले आहेत. शहनाजचे हे वागणं प्रेक्षकांना फारसं आवडलं नाही आणि यासाठी अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मात्र काही लोकं तिला सपोर्टही करताना दिसले.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटातून शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ती सलमानसोबत (Salman Khan) काम करण्याचाही अनुभव घेणार आहे. 


शहनाजसाठी ही एक मोठी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या अभिनय क्षेत्रात आपली ओळख तयार करण्यात व्यग्र असणाऱ्या शहनाजनं कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.