मुंबई : Shehnaaz Gill Bollywood Debut: सलमान खानच्या वतीनं यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला खास हजेरी लावली ती म्हणजे अभिनेत्री शहनाज गिल हिनं. पंजाबची कतरिना अशी ओळख असणाऱ्या शहनाजचा पार्टीतील व्हिडीओ आणि तिचं सलमानसोबत असणारं नातं यावेळी सर्वांनीच पाहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानशी शहजनाजची जवळीक खूप काही सांगून जाणारी होती. त्यातच चर्चा रंगल्या, की ही अभिनेत्री येत्या काळात सलमानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. शहनाज गिल (Shehnaaz Gill) सलमान खान (Salman Khan)च्या 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali)मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कळत आहे. 


चित्रपटात ती, आयुष शर्मा याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हल्लीच एके ठिकाणी जेव्हा शहनाजला तिच्या या आगामी प्रोजेक्टविषयी विचारलं गेलं तेव्हा तिच्याकडून मिळालेलं उत्तर बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेलं. 


मुंबई विमानतळावर जेव्हा शहनाजला सलमानसोबतच्या आगामी प्रोजेक्टविषयी विचारण्यात आलं, तेव्हा तिनं काहीच न बोलता फक्त एका स्मितहास्यानं प्रश्नाचं उत्तर दिलं. 



शहनाजचं हे असं व्यक्त होणं बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडून गेलं. आता मुद्दा असा, की शहनाजला सलमानच्या चित्रपटाची लागलेली लॉटरी पाहता, 'ये तो होना ही था... ' अशाच शब्दांत अनेकजण व्यक्त झाले आहेत. 


शहनाज आणि सलमानची केमिस्ट्री पाहता, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये कळवा....