Shehnaaz Gill Elvish Yadav Video : अभिनेत्री शहनाज गिलनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. फक्त अभिनय नाही तर तिची गाणी देखील तितकीच प्रेक्षकांना आवडतात. 'घनी शनि', 'तू यहीं है' सारखी काही गाणी गात सगळ्यांच्या मनावर राज्या करणारी शहनाज आता पुन्हा एकदा एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या या गाण्याचं नाव 'धूप लगदी' असं आहे. नुकतंच तिचं गाणं प्रमोट करण्यासाठी एल्विशनं यादवसोबत कोलॅबरेशन केलं आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्विशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एल्विश आणि शहनाज या दोघांनी 'धूप लगदी' या गाण्यातून त्यांची केमिस्ट्री दाखवली आहे. तर एल्विश आणि शहनाजनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांनी केलेली ट्विनिंगनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत एकमेकांमध्ये गुंतलेले एल्विश आणि शहनाज एकमेकांचा हाथ पकडून रोमान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत एल्विशनं कॅप्शनमध्ये म्हटले की 'मेरी तकमील में शामिल हैं कुछ तेरे हिस्से भी, हम अगर तुझसे न मिलते तो अधूरे रह जाते।' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शहनाज आणि एल्विशची केमिस्ट्री पाहता नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की "माझे दोन आवडते कलाकार एकाच व्हिडीओत." दुसरा नेटकरी म्हणाला, "शहनाजला तू आवडत असणार असं मला वाटतंय." तिसरा नेटकरी म्हणाला, "तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर असलेली स्माईल खूप सुंदर होती." तिसरा नेटकरी म्हणाला की "सगळ्यात चांगलं कोलॅबरेशन, तुमच्या दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री खूप सुंदर दिसते." आणखी एक नेटकरी म्हणाला "ते दोघं एकत्र किती सुंदर दिसतात हे आज कळतंय." 


हेही वाचा : गोळ्या झाडून वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला मारलं, 34 वर्षांनंतर अभिनेत्यानं सांगितली भयावह घटना 


शहनाजच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'पटना शुक्ला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर तिनं 'दिल क्या इरादा तेरा' गाण्यासाठी तिचा आवाज दिला आहे आणि तिच्या आवाजाची सगळीकडून स्तुती करण्यात आली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काहीच दिवसात शहनाजनं तिचं सिंगल सॉन्ग 'धूप लगदी' प्रदर्शित केलं आहे.