मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. शहनाज अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 'शेप ऑफ यू' शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. नुकताचं शिल्पाने एपिसोड युट्यूबवर पोस्ट केला आहे. शोमध्ये शहनाज तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली. एवढंच नाही तर यावेळी शेहनाजने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील प्रेक्षकांना सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. पण आता तिने स्वतःला सावरलं आहे. अनेक ठिकाणी ती आनंदात दिसत आहे. पण या सर्व परिस्थितीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना कराला लागत आहे. 


दरम्यान, शहनाजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये शेहनाज तिच्या मॅनेजरच्या साखरपुड्यात डान्स करताना दिसली. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात येत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ट्रोलिंगचा सामना करत असलेली शहनाज म्हणाली, 'सिद्धार्थ आणि माझं नातं कसं होतं, हे आम्हा दोघांना माहिती आहे. आमच्या नात्याबद्दल मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही...'


ती पुढे म्हणाली, 'सिद्धार्थ मला कायम म्हणायचा कितीही संकटं आली, तर आनंदी राहा. त्यामुळे मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. आनंदी राहण्याचा प्रत्येकाला हक्क आहे... आणि मी आता कायम आनंदी राहिलं...'