Sidharth Shukla Birthday : प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) मागील वर्षी जगाचा निरोप घेतला. पण आजही चाहते त्याची आठवण काढताना दिसतात. त्यांन जरी जगाचा निरोप घेतला असला तरी चाहत्यांच्या मनातला मात्र निरोप तो घेऊ शकला नाही. आजही चाहत्यांच्या हृदयात त्याच्या आठवणी जिवंत आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही या गोष्टीवर विश्वास ठेवणे तितकेच कठीण आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. हे सर्व कसे घडले हे कोणालाच समजले नाही? सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनानंतर आज 12 डिसेंबर हा त्यांचा दुसरा वाढदिवस (Sidharth Shukla Birthday) आहे. या निमित्ताने शहनाज गिलने (Shehnaaz Gill) त्याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. (Shehnaaz Gill gets emotional again in the memory of Sidharth Shukla the photo will bring tears to his eyes bollywood nz)



सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस साजरा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाजने पुन्हा एकदा दिवंगत अभिनेत्याचे स्मरण केले आणि वाढदिवसाच्या (Birthday Wishes) शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने बरोबर 12 वाजता सिद्धार्थ शुक्लाचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Account) शेअर केला आहे. त्याचवेळी शहनाजने या फोटोसोबत शेअर केलेले कॅप्शन (Caption) वाचून लोक पुन्हा एकदा भावूक होण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.



शहनाज गिलची पोस्ट


 



 


सिद्धार्थ शुक्लाच्या फोटोला कॅप्शन देत शहनाजने लिहिले, 'मी तुला पुन्हा भेटेन...12.12' याशिवाय शहनाजने एकामागून एक अनेक इंस्टाग्राम स्टोरीज (Insta Story) शेअर करून अभिनेत्याची आठवण काढली आहे. शहनाजने येथे दोन केकचे फोटो शेअर केले आहेत. यापैकी एकावर सिड लिहिले आहे आणि दुसऱ्यावर 12.12 लिहिले आहे.


सिद्धार्थला आठवून अभिनेत्री खूप भावूक झाली आहे. याच कारणामुळे तिने सोशल मीडियावर स्वतःचे आणि सिद्धार्थचे सर्वात सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दोन हात दिसत आहेत, त्यापैकी एक शहनाजचा आणि दुसरा सिद्धार्थ शुक्लाचा असल्याचे समजते. दुसरीकडे, दुसऱ्या फोटोमध्ये शहनाज आणि सिद्धार्थची सर्वात सुंदर आणि लाडकी जोडी दिसत आहे.


 


चाहते प्रेम लुटतात


हे फोटो पाहिल्यानंतर एकीकडे चाहते सिडनाजच्या (Sidnazz) जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी आपल्या आवडत्या सनालाही धैर्य राखण्यास सांगितले. शहनाज गिलच्या फोटोवर कमेंट (Comment) करताना एका यूजरने लिहिले की, 'त्या व्यक्तीला गमावल्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही... सिद्धार्थच्या जाण्यानंतर जणू तुमचे बालपण संपले आहे', तर दुसऱ्याने लिहिले की, 'सिडनाज आमच्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. . तिसर्‍याने लिहिले की, 'तिने सिद्धार्थची पुण्यतिथी साजरी केली नाही पण त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, याचा अर्थ सनासाठी सिड अजूनही जिवंत आहे.' याशिवाय आणखी एक यूजर लिहितो, 'कोणी एखाद्यावर इतके प्रेम कसे करू शकते..



बिग बॉसच्या घरात पहिली भेट


सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट बिग बॉस सीझन 13 (Big Boss 13) मध्ये झाली होती. शोमध्ये दोघांची मैत्री चांगलीच पसंत पडली आणि चाहते या सुंदर जोडप्याला सिदनाज नावाने हाक मारू लागले. बातम्यांनुसार, दोघेही लवकरच लग्न करणार होते, परंतु कदाचित नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे ठेवले आहे.


सिद्धार्थ शुक्ला यांचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac arrest) निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन (entertainment) विश्व आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आजही अभिनेत्याच्या चाहत्यांना यावर विश्वास बसत नाही, तर दुसरीकडे शहनाजही अनेकदा तिच्या खास मित्राची आठवण काढताना दिसते.