शहनाजच्या आजही जवळ आहे सिद्धार्थ, `या` गोष्टीमुळे झालं सिद्ध
`हेचं आहे खरं प्रेम...`, शहनाज जवळ सिद्धार्थची महत्त्वाची गोष्टी, `त्या` आठवणीत जगतेय आयुष्य
मुंबई : दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शेहनाज गिल यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. 'बिग बॉस'च्या घरात त्यांची मैत्री झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'बिग बॉस' शो संपल्यानंतर देखील कायम दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सिद्धार्थ-शहनाजने चाहत्यांना कपल गोल्स दिली. दोघे लग्न कधी करणार असे प्रश्न देखील चाहते विचारत होते.
पण एक दिवस असा आला, ज्यामुळे सगळं काही संपलं. गेल्यावर्षी सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली. सिद्धार्थच्या निधनानंतर ती कित्येक दिवस शुटिंग आणि सोशल मीडियापासून दूर होती.
पण आता शहनाजने स्वतःला सावरलं आहे. शेहनाज सध्या सिद्धार्थच्या आठवणींसोबत जगत आहे. नुकताचं शेहनाजला एका ठिकाणी स्पॉट करण्यात जेव्हा तिच्या फोनमध्ये डिसप्लेवर सिद्धार्थसोबत फोटो दिसला..
सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. हेच खरं प्रेम... असे अनेक कमेंट तिच्या व्हिडीओवर येत आहेत.