मुंबई : शहनाज गिल हे बिग बॉसचं गाजलेलं नाव आहे. जे कोणीही कधीच विसरू शकणार नाही. बिग बॉस 13 मधील शहनाजला फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण भारत ओळखतो. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर तिला स्वत:ला सांभाळायला बराच वेळ लागला. पण आता ती सिडच्या आठवणी घेऊन आपल्या सामान्य आयुष्यात पुढे जात आहे. शहनाज सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि अनेकदा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉम एलिससोबत दिसणार शहनाज!
शहनाज गिलने हॉलिवूड वेब शो 'लुसिफर'चं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये शोमधील मुख्य अभिनेता टॉम एलिस शहनाजसोबत दिसत आहे. फोटोमध्ये टॉम आणि शहनाजची जोडी परफेक्ट दिसत आहे. या जोडीचा फोटो पाहिल्यानंतर फोटोशॉप केलेलं आहे की ओरिजिनल हे सांगणं कठीण आहे.



सोशल मीडियावर पोस्टर शेअर केली आहे
ही पोस्टर शहनाजने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्टर शेअर करताना शहनाजनं लिहिलं आहे की, 'खरा बिग बॉस ईथे आहे #NetflixIndiaPlayback2021 #Playback2021'. शहनाजची ही पोस्ट पाहता तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.