मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते. शहनाजचा एक फोटो जरी असला तरीही सोशल मीडियावर तिच्या फोटोची चर्चा रंगायला सुरुवात होते. आता देखील शहनाजचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शहनाज सुंदर साडीमध्ये दिसत आहे. एवढंच नाही तर, केसात माळलेला तिचा गजरा देखील शहनाजवर फार फुलून दिसत आहे. शहनाजचा हा पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाजचा हा लूक अभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातील असल्याचं सांगण्यात येत आहे. शहनाज गिलने तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये शहनाज व्हॅनिटी व्हॅनमधून उतरून सेटच्या दिशेने चालताना दिसत आहे. सध्या तिचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लूक व्हायरल झाल्यानंतर शहनाजचा फर्स्टलूक कधी समोर येणार या प्रतीक्षेत अभिनेत्रीचे चाहते आहेत.