मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिल पूर्णपणे कोलमडली आहे. अत्यंत जवळचा व्यक्ती अचानक सोडून गेल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरण आणि सोशल मीडियापासून दूर आहे. पण आता शेहनाजचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. 'हैसला रख' चित्रपटातील गाणं ऐकताचं तुम्ही देखील ठेका धरल्याशिवाय राहणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हैसला रख' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. गाण्यात गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) देखील दिसत आहे. आता प्रदर्शित झालेल्या गाण्याचं नाव 'चॅनल नंबर 5' असं आहे. 



या गाण्यात दिलजीत दोसांझ अभिनेत्री सोनम बाजवा सोबत डान्स करत आहे, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. त्याचं गाणं चाहते खूप पसंत करत आहेत. गाण्यात दिलजीत त्याच्या गर्लफ्रेन्डला शेहनाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.


'हौसला रख' चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमरजीत सिंग सरोन यांच्या खांद्यावर आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.