मुंबई : राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 28 जुलै रोजी कोर्टाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली. आता पोर्नोग्राफीच्या प्रकरणात बऱ्याच अभिनेत्री राज कुंद्राच्या अ‍ॅप हॉटशॉट्सविरूद्ध उघडपणे बोलत आहेत. या प्रकरणात राज कुंद्रावर अश्ली-ल चित्रपट बनवण्याचा आणि प्रकाशित करण्याचा आरोप आहे. शर्लिन चोप्रानेही त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच शर्लिनने राज कुंद्रावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्लिन चोप्राचे राज कुंद्रावर गंभीर आरोप 
एका वृत्तानुसार, शार्लिन चोप्रा पोर्नोग्राफी प्रकरणात आपलं वक्तव्य नोंदवण्यासाठी मुंबई क्राईम ब्राँचसमोर हजर झाली होती. तिने राज कुंद्राविरोधात एप्रिल 2021 मध्ये लैंगिक छळाची एफआयआर दाखल केली होती. त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्रीने राजवर अनेक गंभीर आरोप केले होते.


राज कुंद्राने शर्लिन चोप्राला किस करायला सुरुवात केली
शर्लिन चोप्राने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, नकार दिल्यानंतरही राज कुंद्रा तिला जबरदस्तीने किस करत होता. तसंच शर्लिनने असा दावा केला आहे की, तिला विवाहित पुरुषाशी असे संबंध नको आहेत. यावर राजने शरलिनला सांगितलं की, पत्नी शिल्पा शेट्टीसोबतचे त्याचे संबध फारसे चांगले नाही, शिल्पाशी असलेल्या नात्यात कटुता असल्यामुळे राजने सांगितले की, तो बहुतेक वेळेस तणावात रहायचा.


शर्लिन चोप्राने वाचवली लाज 
शार्लिन चोप्रा पुढे म्हणाली की, तिने राज कुंद्राला घाबरुन थांबण्यास सांगितलं. मात्र तो थांबत नव्हता. मग शर्लिन त्याला ढकलून वॉशरूममध्ये गेली. 28 जुलै रोजी राजला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनीही राजच्या निवासस्थानी छापा टाकला आणि काही दिवसांपूर्वी पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली.



30 लाखमध्ये शर्लिन करायची हे काम
महाराष्ट्र सायबर सेलने यापूर्वीच शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची निवेदने नोंदविली होती. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर क्राईम ब्रांचच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असं म्हणली की, राज कुंद्रानेच तिला एड-ल्ट इंडस्ट्रीमध्ये आणलं. शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे 15 ते 20 प्रोजेक्ट केले आहेत.