`त्याने प्रायव्हेट पार्ट काढत..`; Sherlyn Chopra चा Sajid Khan वर गंभीर आरोप
आतापर्यंत आठ महिलांनी साजिद खानवर केले लैंगिक अत्याचाराचे आरोप
मुंबई : फिल्ममेकर साजिद खान (Sajid Khan) वर नवीन आरोप लावण्यात आले आहेत. हे आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ने लावले आहेत. शर्लिनने आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. शर्लिनने सांगितलं की, एका मुलाखतीत साजिद खानने तिच्याशी कशी वर्तणूक केली होती. सहा वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेबाबत शर्लिन सांगते.
शर्लिनने सांगितली ही गोष्ट
शर्लिन चोप्रा (Sherlyn Chora) ने ट्विटमध्ये म्हटलंय की,'जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर मी एप्रिल २०१५ मध्ये साजिद (Sajid Khan) यांना भेटली तेव्हा त्यांनी आपल्या पँटमधून प्रायव्हेट पार्ट बाहेर काढून म्हटलं की, याला फिल करं. तेव्हा शर्लिन यांनी स्पष्ट म्हटलं, मला माहित आहे. प्रायव्हेट पार्ट कसं असतं ते. आणि माझ्या भेटी मागचा हा उद्देश नव्हता.'
अभिनेत्री जिया खानच्या बहिणीने लावले गंभीर आरोप
अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) ची बहिण करिश्मा (Karishma) ने अनेक खुलासे केले आहेत. बीबीसीच्या मुलाखतीत तिची बहिणीने दिग्दर्शक साजिद खानने शारीरिक शोषण (Sexually Harassed) केलं होतं. साजिद खानने अभिनेत्रीला टॉपलेस होण्यास सांगितलं होतं. साजिद खानवर या अगोदरही शारीरिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. जिया खानची बहिण करिश्मा असे आरोप करणारी सातवी महिला आहे. अशातच आता शर्लिन चोप्राच्या नावाची भर पडली आहे.
करिश्मावर या सिनेमा दरम्यान घडली घटना
जिया खानने साजिद खानच्या मल्टीस्टारर सिनेमा 'हाऊसफुल्ल'मध्ये काम केलं आहे. करिश्माने सांगितलं होतं की,'सिनेमाची तयारी सुरू झाली होती. आणि साजिद खानने म्हटलं की, तू टॉप आणि ब्रा काढून टाक.' जियाला तेव्हा नेमकं काय करावं? हे कळत नव्हतं. तिने घडलेली संपूर्ण घटना करिश्माला सांगितलं.