मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तथापि, हे आरोप समोर आल्यानंतर हुमा कुरेशी, तपासी पन्नू, कल्की कोचलीन, अंजना सुखानी, सुरवीन चावला यासारख्या अन्य अभिनेत्री अनुरागच्या समर्थनार्थ बाहेर आल्या आणि त्यांनी असेही म्हटले आहे की हे आरोप शक्तीविरोधात उभे केले गेले आहेत. त्याचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून शर्लिन ने पायल घोषच्या समर्थन करण्यास पुढाकार घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शर्लिन यांनी ट्विट केले, "प्रिय @iampayalghosh, कृपया हे समजले की आपण या लढाईत एकटे नाही. सर्वजण ज्यांना सत्यतेची आणि अखंडतेची कदर आहे ते सर्व तुमच्या सोबत आहे. ते म्हणतात - पायल यांना तक्रार नोंदवण्यासाठी.एवढी वर्ष का लागली. ठीक आहे, खूप वेळ लागतो असे अनुभव जाहीर करायला. सोप्पं नाही आहे हे. 



शार्लिन चोप्रा यांनी पुढे ट्विट केले की, “एखाद्या स्त्रीला अनुचित घटनेची नोंद केव्हा करावी लागेल हे सांगणे हास्यास्पद आहे. वर्षानुवर्षे प्रकरण नोंदवण्यामुळे सत्य असत्य ठरते काय? मी कंगनाचे आभार मानते कि आम्हाला सत्य बोलण्यास प्रोत्साहित केले आहे 



पायल घोषने ट्विट करून शर्लिन चोप्रा चे तिला समर्थन देण्याचे आभार मानले.