शर्लिन चोप्राकडून राज कुंद्रा सोबतच्या पहिल्या प्रोजेक्ट दरम्यानचे फोटो शेअर
शर्लिन चोप्राने चौकशीदरम्यान राज कुंद्राबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
मुंबई : अश्ली-ल चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात शर्लिन चोप्राचीही मुंबई गुन्हे शाखेने सुरुवातीचे काही दिवस चौकशी केली होती. याचबरोबर शर्लिन चोप्राने पोलिस चौकशीदरम्यान राज कुंद्राबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
त्याचबरोबर शर्लिनने अलीकडेच राज कुंद्रावर जबरदस्तीने किस करण्याचा आरोपही केला आहे. आता शर्लिन चोप्राने बुधवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे लोकांचं आश्चर्य वाढलं आहे. या फोटोमध्ये राज कुंद्रा शर्लिनसोबत दिसत आहे. या फोटोसोबत, शर्लिन चोप्राने दावा केला आहे की, 'द शर्लिन चोप्रा' अॅपच्या पहिल्या शूट दरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे.
29 मार्च, 2019 का दिन था।
आर्म्स्प्राइम द्वारा आयोजित 'द शर्लिन चोपड़ा' एैप का पहला कॉन्टेंट शूट होने जा रहा था।
मेरे लिए यह एक नया अनुभव था क्योंकि पहले कभी किसी एैप के साथ मैं जुड़ी नहीं थी।
उम्मीद और जोश का माहौल था। pic.twitter.com/TKZptsvnGe
शर्लिन चोप्राने फोटोसोबत लिहिलं आहे की, '29 मार्च 2019चा दिवस होता. आर्म्सप्राईमने आयोजित केलेल्या 'द शर्लिन चोप्रा' अॅपचं पहिले कंटेंट शूट होणार होतं. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. कारण मी यापूर्वी कोणत्याही अॅपशी संबंधित नव्हते. आशा आणि उत्साहाचे वातावरण होतं. शर्लिनचं सोशल मीडियावरील ट्विट आता विविध प्रकारे व्यक्त होत आहे. शर्लिनच्या या ट्विटवरून समजतं की, शर्लिनने राजवर केलेले आरोप खरे आहेत. याशिवाय शर्लिन चोप्रा हिनेही राज कुंद्राविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती.