मुंबई : डायरेक्ट-टू-स्ट्रीम हिंदी अमेझॉन ओरीजनल सिनेमा 'शेरनी'चा ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आज अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वतीने करण्यात आली. आपल्या शैलीसाठी चर्चेत असलेला फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक असून अबंडनतिया एंटरटेनमेंटची  निर्माती आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन असून शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी या अष्टपैलू कलाकारांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शेरनी' या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  



आगामी अमेझॉन ओरीजनल मुव्हीबद्दल बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडीओचे डायरेक्टर अँड हेड, कंटेंट विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून अबंडनतिया एंटरटेनमेंट कथाकारांचे पॉवरहाऊस बनले आहे, ताज्या दमाची आणि गुंगवून ठेवणाऱ्या कथा आमचे त्यांच्या सोबतचे नाते आणखी दृढ करतात. शकुंतला देवी यांची यशोगाथा प्रस्तुत केल्यानंतर आम्ही शेरनीकरिता उत्साही आहोत. भारत आणि जगभरातील ग्राहकांसाठी पुन्हा एकदा विद्या बालन अभिनीत सिनेमा घेऊन आम्ही येत आहोत. हा सिनेमा  विलक्षण विजयश्रीची कहाणी सांगतो. ती केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणार नाही, तर त्यांना आरामात घरी बसून साहसी अनुभव देऊ करेल.”


या विषयीचा उत्साह शब्दांत मांडताना अबंडनतिया एंटरटेनमेंटचे निर्माते आणि सीईओ विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. विषयाला समर्पकत प्राप्त करून देण्यासाठी कायमच अमितची मार्गदर्शक भूमिका लाभली आहे.  व्यंगात्मक टिपण्णी ही त्याची शैली सिनेमाला अधिक रोचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे. शेरनी’चे ‘फर्स्ट डे फर्स्ट स्ट्रीम’करिता आता आणखी प्रतीक्षा नको!”


टी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले की, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे. विक्रम समवेत काम करणे कायमच आनंददायक असते. अबंडनतिया एंटरटेनमेंट’सोबत आणखी मनोरंजक व हटके कथांवर काम करण्यासाठी मी यापुढेही उत्सुक आहे”.