बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) गेल्या सात वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. आज दोघेही आनंदी जीवन जगत असले तरी एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्यावर फार टीका करण्यात आली. त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर (Social Media) फार ट्रोल करण्यात आलं. नुकतंच दोघांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टला (Rhea Chakraborty's podcast Chapter) हजेरी लावली. यावेळी शिबानी दांडेकरने फऱहान अख्तरला डेट करु लागल्यानंतर कशाप्रकारे ट्रोल करण्यात आलं यावर भाष्य केलं आहे. 


शिबानी दांडेकर काय म्हणाली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"रोज नित्याने, कदाचित आता तेवढं नाही, पण जेव्हा माझ्या फरहानसोबतच्या नात्याची सुरुवात झाली तेव्हा मला लव्ह जिहाद, गोल्ड डिंगर असं हिणवण्यात आलं. लोक मला मुख्यत्वे या दोन गोष्टींवर बोलत होते. मी त्यावर नेमकं काय करणं अपेक्षित होतं? तुम्हीच सांगा. फक्त लोक बोलत आहेत म्हणून काय मी रडत बसणार नाही. मी काही गोल्ड डिगर नाही. सत्य हेच आहे की, तो एका मुस्लीम कुटुंब किंवा मुस्लीम पार्श्वभूमीतून आला आहे आणि मी एक हिंदू कुटुंबातील आहे. आम्ही लग्न केलं असून, आमच्या लग्नात आनंदी आहोत. हीच परिस्थितीची सत्यता आहे. त्यामुळे मी हेच सांगू शकते की, तुम्हाला आमच्याबद्दल जे काही हवं आहे ते हेच आहे".


फरहान अख्तर काय म्हणाला?


फरहान अख्तरने शिबानी दांडेकरच्या म्हणण्याचं समर्थन केलं. तसंच वैयक्तिक आणि चित्रपटावर होणारी टीका यावरही भाष्य केलं. "जर तुम्हाला दुखावण्याचा हेतू असेल तर मग ते गांभीर्याने कशाला घ्यायचं? काही वेळा ते लिहितील. म्हणजेच तुम्ही चित्रपटाचा रिव्ह्यू समजा. त्यांना चित्रपट कदाचित आवडला असेल किंवा नसेल. जर चित्रपटाबद्दल लिहिलं असेल तर त्या रिव्ह्यूमधून काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजेच चित्रपटातील या गोष्टी कमकुवत होत्या किंवा काही परफॉर्मन्स आणखी चांगले होऊ शकले असते. तुम्हाला मी काय सांगतोय ते समजत असेल. जर ते लिहिलं असेल तर तुम्ही चित्रपटासाठी कितीही मेहनत घेतली असेल किंवा कितीही त्याची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत असाल, ते चांगल्या हेतूने असेल तर तुम्ही खुल्या मनाने वाचता. पण जर हेतू तुम्हाला निरुत्साह करण्याचा असेल, कारण प्रत्येकजण करत आहे तर तुम्ही ते लपवू शकत नाही".


"नजर अगदी स्पष्ट आहे. हेतू असा आहे की, जरी ‘तुम्ही या छायाचित्रात जे परिधान केले आहे ते मला आवडत नाही’ पण जर ते तुम्हाला योग्य वाटेल अशा प्रकारे लिहिले असेल तर, ‘हो, कदाचित तुम्ही बरोबर आहात,’ अशीच प्रतिक्रिया असेल. फक्त हेतूचा प्रश्न आहे," असं तो म्हणाला.


फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी 2017 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. कामाबद्दल बोलायचं गेल्यास फरहान 120 बहादूर चित्रपटात झळकणार आहे. तसंच डॉन 3 आणि जी ले जराचं दिग्दर्शन करणार आहे. तसंच शिबानी दांडेकर डब्बा कार्टेलमध्ये झळकणार आहे.