फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरकडे चाहत्यांसाठी गुडन्यूज?
अभिनेत्री शिबानी दांडेकरने फरहान अख्तरसोबत तिच्या लग्नाच्या चर्चेंवर सोडलं मौन
मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकरने एका मुलाखती दरम्यान फरहान अख्तरसोबत तिच्या लग्नाच्या चर्चेंवर आपलं मौन सोडलं आहे. शिबानी दांडेकर म्हणाली की, तिने आणि फरहान अख्तर यांनी अद्याप लग्नासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोघेही एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेतात आणि आनंदी असतात. शिबानी दांडेकरला काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरच्या घरी स्पॉट केलं होतं. ती डिनरसाठी फरहान अख्तरच्या घरी गेली होती. जिथे कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित होते. पार्टीमधून बाहेर पडलेली शिबानी दांडेकरचे फोटो पाहून लोक म्हणायला लागले की, दोघंही लवकरच लग्नगाठ बांधू शकतात, पण अभिनेत्रीच्या या विधानानंतर चाहते नाराज होवू शकतात.
'लव्ह इन द टाइम्स ऑफ कोरोना' या चित्रपटाद्वारे शिबानी दांडेकर लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करेल की कोरोनाच्या काळात सामान्य लोकांचे प्रेम कसं वाढले आणि प्रेमाच्या मार्गात कोणत्या अडचणी आल्या. शिबानी दांडेकर या चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये सध्या व्यस्त आहे.
जर आपल्याला फरहान अख्तरबद्दल बोलायचं झालं तर तो राकीश ओम प्रकाश मेहरा निर्मित 'तुफान' सिनेमामध्ये दिसला होता. या चित्रपटात फरहान अख्तरने एका बॉक्सरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही लोकांना हा सिनेमा आवडला तर काही लोकांनी या सिनेमाला एवरेज चित्रपट म्हटलं. तूफान या चित्रपटात मृणाल ठाकूर फरहान अख्तरसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. ज्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती.