मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोसिस स्लिमिंग स्किन सलून आणि स्पा नावाने शिल्पा शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टीने कंपनी सुरू केली आहे. याची शाखा राजधानी दिल्लीत खोलण्याच्या नावावरून अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. (Shilpa Shetty and mother Sunanda Shetty files cheating complaint in Rs 1.6 crore land deal case) त्यांना सेंटर देण्याच्या नावावरून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात विभूतिखंड ठाणे प्रकरणात ओमेक्स हाइट्समध्ये राहणारे निवासी ज्योत्स्ना तौहान आणि हजरतगंज पोलिस ठाण्यात रोहित सिंहने फसवल्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये शिल्पा आणि तिची आई सुनंदाची भूमिका समोर आली आहे. या संबंधात हजरतगंज पोलिस ठाण्यातून एका महिन्यापूर्वी नोटीस देण्यात आली आहे.पोलिसांची विशेष टीम मुंबईत पोहोचली असून कोणत्याही क्षणी अटक केलं जाऊ शकतं. 


विभूतिखंड पोलीस ठाण्यात ओमेक्स हाईट्समध्ये राहणाऱ्या ज्योत्स्ना चौहान यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये तक्रार नोंदवली होती. यामध्ये आरोप करण्यात आला आहे की, वेलनेस सेंटर सुरू करण्यासाठी आयोसिस कंपनीच्या किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इशरफिल, नवनीत कौर, आशा, पूनम झासह अनेक लोकांवर आरोप करण्यात आले. 


 पॉर्नोग्राफी प्रकरणातील उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. रोज एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर येत आहे. या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री शर्लिन चोप्रा. शर्लिन चोप्राने क्राईम ब्राँचच्या प्रॉपर्टी सेलला जबाब दिला आहे. यावेळी शर्लिनने राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं नाव पुढे केलं आहे. त्यामुळे आता शिल्पाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होवू शकते अशी शक्यता नाकारता येत आहे.