मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी रूपेरी पडद्यापासून दूर आहे. पण आता ती पुन्हा एकदा रोल.. कॅमेरा..ऍक्शनसाठी सज्ज झाली आहे. शिल्पा 'हंगामा 2'  (Hungama 2) चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या चित्रीकरणार व्यस्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या आगामी चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते परेश रावल देखील भूमिका साकारणार आहेत. सध्या चित्रपटाच्या टायटल गाण्यावर संपूर्ण टीम काम करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूनिटच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'गाण्यात धम्माल, मस्ती आहे. एकाच फ्रेममध्ये 4 कलाकार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम उत्तम काम करत असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.' 'हंगामा 2' चित्रपट 'हंगामा' या पहिल्या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 



'हंगामा' चित्रपटाची शूटींग 2003साली करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने 'हंगामा 2' रूपेरी पडद्यावर हंगामा करणार आहे. दरम्यान 'हंगामा 2' चित्रपटाचं चित्रीकरण गेल्या वर्षीच सुरू होणार होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परिणमी याच मोठा फटका संपूर्ण कलाक्षेत्राला बसला. 


खुद्द शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत असल्याची घोषणा केली. 'पुन्हा एकदा सेटवर. कोविड टेस्टेड. ' असं कॅप्शन देत तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.