मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटक प्रकरणाला आज वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी याच दिवशी राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी  (porn case) अटक करण्यात आली होती. पण राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली आहे. पॉर्नोग्राफीनंतर राज पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. राज कुंद्रा 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या वादग्रस्त शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. याबाबत राजला विचारण्यात आल्याचं देखील समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, राज कुंद्राने अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) शोमध्ये येण्यासाठी भरघोस फी मागितली आहे. राज कुंद्रा निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. राजने या पूर्ण सीझनसाठी तब्बल 30 कोटी रुपये मागितल्याचं कळत आहे.  (salman khan bigg boss 16 show)
 
याबद्दल खुद्द राजने मोठा खुलासा केला आहे. राज कुंद्राने निर्मात्यांना फी एका एनजीओला (NGO) देणार असल्याचं सांगितलं. 'शिल्पा आणि माझ्याकडे पुरेशी संपत्ती आहे. मला शोमधून मिळालेले पैसे एका एनजीओला दान कारयचे आहेत...' असं राज म्हणाला. (Net worth of shilpa shetty and Raj Kundra)


राजने निर्मात्यांकडून 30 कोटी रुपये मागितले आहेत, पण 20 कोटी रुपयांपर्यंत करार होणार असल्याची शक्यता असल्याचं सांगत येत आहे. जर राजने खरंच शोमधून मिळाले पैसे दान केले तर, पॉर्नोग्राफी (pornography case) प्रकरणानंतर त्याची जी प्रतिमा लोकांच्या मनात आहे, ती बदलू शकेल.