अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीत; धक्कादायक माहिती समोर
पुन्हा अडचणीत आला शिल्पा शेट्टीचा पती, यावेळी काय पराक्रम केले? अनेकांचाच सवाल
Pornography Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच तिच्या फिटनेस (Fitness) आणि फॅशनसाठी (Fashion) चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं एकेकाळी सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये तीची गणना केली जात होती. शिल्पा शेट्टी ही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय असते सध्या चर्चेत असण्यामागचे कारण आहे तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra). (Shilpa Shetty husband Raj Kundra in trouble again in obscene video case In front of shocking information nz)
आरोपपत्र दाखल
बिझनेसमन (businessman) राज कुंद्रा याचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी (Maharashtra Cyber Police) पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा (Sharlin Chopra) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये दावा केला आहे की राज कुंद्राने मुंबईजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये (Mumbai 5 Star Hotel) अश्लील चित्रपट शूट केले आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकले. एवढेच नाही तर राज कुंद्राने या डीलमधून करोडोंची कमाई केल्याचेही सायबर सेलने सांगितले आहे.
हे ही वाचा - अभिनेत्यानं स्क्रिनवर Intimate Scene देण गर्लफ्रेंडला आवडलं नाही, तर त्यानं केला ब्रेकअप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर सेलने राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, फिल्ममेकर मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन राजू दुबे यांच्या विरोधात 450 पानांचे आरोपपत्र (charge sheet) दाखल केले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, बनाना प्राइम ओटीटीचे (Prime OTT) सुवाजित चौधरी आणि राज कुंद्राचा कर्मचारी उमेश कामथ यांचीही लंडनस्थित कंपनी 'हॉटशॉट'मध्ये व्यवस्थापक म्हणून नावे आहेत. इतकंच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुवाजित चौधरी आणि उमेश कामथ यांच्यावर 'प्रेम पगलानी' ही वेबसीरिज बनवून अश्लील कंटेंट असलेली वेबसीरिज (Webseries) बनवून ओटीटीवर अपलोड केल्याचा आरोप आहे.
'द पूनम पांडे' अॅप
पूनम पांडेवर राज कुंद्राच्या कंपनीच्या मदतीने स्वतःचे मोबाइल अॅप 'द पूनम पांडे' विकसित करणे, व्हिडिओ शूट करणे, अपलोड करणे आणि प्रसारित केल्याचा आरोप आहे. सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅमेरामन राजू दुबेने शर्लिन चोप्राचे व्हिडिओ (Video shoot) देखील शूट केले होते, तर झुनझुनवालाला कथा लिहिण्यात आणि दिग्दर्शित करण्यात तिला मदत केल्याचा आणि प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर 'हॉटशॉट' ही कंपनी राज कुंद्राचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्या 'केनिन' या कंपनीच्या मालकीची आहे, जी यूकेमध्ये नोंदणीकृत आहे.
हे ही वाचा - 'पती आणि लेकीचा फोटो...', Alia Bhatt ची नवी पोस्ट पाहून चाहते आनंदी
काही मॉडेल्सचा (Models) शोध
पॉर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात या सर्व आरोपींकडून राज कुंद्रा यांच्या 'आर्मस्प्राईम' कंपनीने पैसे घेतल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. त्यामुळे या कंपनीला गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस या प्रकरणात अजूनही काही मॉडेल्सचा (Models) शोध घेत आहेत, ज्यांनी बोल्ड चित्रपटांमध्ये काम केले आहे.