मुंबई : शिल्पा शेट्टी सध्या कठीण काळातून जात आहे. तिने आपला एक जवळचा मित्र गमावला आहे. शिल्पा शेट्टीचा पेट डॉग प्रिंसेसचं निधन झालं आहे. शिल्पा शेट्टीने प्रिंसेसच्या आठवणींना उजाळा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रिसेंसचे बालपणापासून ते अखेरच्या क्षणापर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ तिने पोस्ट केले आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये शिल्पा प्रिसेंससोबत बोलताना दिसत आहे. शिल्पाचा मुलगा वियान आणि राज कुंद्रा देखील त्यांच्या पेट डॉगसोबतला मिठी मारताना दिसत आहेच. वियान प्रिसेंसला
आय लव्ह यू बोलताना दिसत आहे. कुत्र्याच्या स्मरणार्थ व्हिडिओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे.


ती लिहिते, "माझं पहिलं मुल... माझी प्रिसेंस शेट्टी कुंद्राने इंद्रधनुष्य ओलांडले आहे. आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आणि गेल्या 12 वर्षांतील आमच्या सोबत घालवलेल्या गोड क्षण घालवल्याबद्दल धन्यवाद."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे ती म्हणते, "माझ्या ह्रदयाचा तुकडा तू सोबत नेला आहेस. तुझी उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. आई-बाब, वियान-राज आणि समिशा तुला मिस करतील.
माझी प्रिसेंस तुझ्या आत्म्याला शांती मिळो."