मुंबई : इंडियन आयडल12च्या आगामी भागाला बरीच मनोरंजन वळणं मिळणार आहेत. कारण सुपर डान्सर सिजन 4ची जज शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर स्टेजवर दिसणार आहेत आणि उपस्थितीत बरीच मस्ती आणि धमाल करताना दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये निहाल आणि सयाली यांनी चमकदार पफॉर्मम्स देखील सादर करणार आहेत, 'ऐ मेरे हमसफर', 'बहोत किताबे' आणि 'चुरा के दिल में' ही गाणी सादर करणार आहेत. स्पर्धकांचा पर्फार्मन्स इतका रोमांचकारी असेल की शिल्पा आणि अनुराग यांचं कौतुक करण्यासाठी स्टेजवर पोहोचतील आणि 'चुरा के दिल मेरा'च्या गाण्यावर नाचताना दिसतील.


याशिवाय शिल्पा तिच्या पहिल्या सिनेमा संबंधित किस्सा शेअर करताना दिसणार आहे. एपिसोड दरम्यान शिल्पाने बाजीगर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने तिला किती मदत केली याचा खुलासा केला आहे. शाहरुखने तिला गाण्यासाठी लिप सिंक करण्यास मदत केली होती. आणि इंडियन आयडॉलच्या सेटवरील शूटशी संबंधित या गाण्याच्या आठवणीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.



यावेळी शिल्पा म्हणाली, 'बाजीगर' हा माझा पहिला चित्रपट होता आणि मी खूप घाबरले होते, पण या वेळी माझा सहकलाकार शाहरुख खूप क्यूट होता, तो मला नेहमी शांत करायचा आणि सीनसाठी मला मदत करायचा. जेव्हा आम्ही 'ऐ मेरे हमसफर' या गाण्याचं शूट करीत होतो आणि मला गाण्यांचे लिप-सिंक करावं लागलं, पण मला ते व्यवस्थित समजत नव्हतं, तेव्हा शाहरुख माझ्या मदतीला आला आणि मला लिप सिंकमधील अगदी त्या बिंदूपर्यंत लिप-सिंक कसे करावं याचं सोपं तंत्र सांगितलं.