मुंबई : आज बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला जुन्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. 2007 मध्ये शिल्पाने राजस्थानमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती जिथे हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरे देखील उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये रिचर्डने शिल्पाला स्टेजवर सर्वांसमोर एकवेळा नव्हे तर अनेक वेळा किस केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं आणि नंतर तिथे उपस्थित लोकांनी शिल्पावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला. आता इतक्या वर्षांनंतर कोर्टाने अभिनेत्रीला या सर्व आरोपातून मुक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट केतकी छवन यांनी शिल्पा शेट्टीला पिडीत असं म्हटलं आहे. केतकी छवन यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात शिल्पा पिडीत होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर मेजिस्ट्रेट केतकी यांना असं आढळून आलं की, शिल्पा ही केवळ पिडीत होती. त्यामुळे शिल्पावरील आरोप निराधार आहेत. पोलिसांचा अहवाल आणि कागदपत्रं पाहता शिल्पाला सर्व आरोपातून मुक्त करण्यात आलं आहे. 


त्या घटनेनंतर शिल्पाविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन राजस्थानमधील आणि एक गाझियाबादमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर (2017) हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने मुंबईकडे वर्ग केलं. शिल्पासाठी हा मोठा दिलासा आहे कारण गेल्या काही काळापासून ती पती राज कुंद्राबाबत अनेक वादात अडकली आहे.


काही काळापूर्वी राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यात शिल्पाच्या सहभागाचं नावही समोर आलं होतं. या प्रकरणात राजला तब्बल दोन महिन्यांनी जामीन मिळाला. वर्कफ्रंटवर, अभिनेत्री सध्या इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये दिसत आहे.