मुंबई : अश्लिल व्हिडिओ शूट केल्यानंतर ते व्हिडिओ ऍपवर अपलोड केल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर शिल्पा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. पण गेल्या काही दिवसांपासून शिल्पा सोशल मीडियापासून दूर आहे. पण आता तिने राजच्या अटकेनंतर पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने पुस्तकाचं एक पान सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टमध्ये तिने जेम्स थर्बन यांचे विचार मांडले आहेत. 'रागात मागे वळून पाहू नका, किंवा भीतीने पुढचं पाहू नका. पण जागृक राहा.  आपण रागात त्या लोकांकडे पाहातो ज्यांनी आपल्याला दुःख दिलं आहे. दुर्दैवी की आपण जे भोगले आहे.... ' अशी भावूक पोस्ट शिल्पाने शेअर केली आहे. 



राज कुंद्रा पोर्नोग्राफीबद्दल सांगायचं झालं तर, फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी फिल्मसचं शुटींग करत असलेल्या 11 जणांना अटक केली होती. तेव्हापासूनच पोलिस या केसचा सखोल तपास करत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध पोलिस तेव्हापासूनच घेत होते. अनेकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना या संपूर्ण रॅकेटमध्ये मोठा चेहरा असल्याचं लक्षात आलं. 


आणि पाच महिन्यांच्या तपासानंतर बॉलिवूडमधील मोठं नाव या प्रकरणात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अचानक या प्रकरणात बिझनेसमन राज कुंद्राला अटक केली.  पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.