शिल्पा शेट्टीची आणखी एक इमोशनल पोस्ट, नेमका विचार काय?
अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या दोन महिन्यांपासून पती राज कुंद्रामुळे चर्चेत आहे.
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या दोन महिन्यांपासून पती राज कुंद्रामुळे चर्चेत आहे. राज कुंद्रा 19 जुलैपासून एका वादामुळे कोठडीत आहे आणि सध्या तरी त्याला जामीन मिळण्याची शक्यता नाही. दरम्यान, पतीच्या अटकेनंतर शिल्पावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दरम्यान, शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्वत: ला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिल्पाने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये शिल्पाने लिहीलं की, 'माझ्या विचारांमध्ये इतकी शक्ती आहे की, ते आमचं आयुष्य कसं असेल हे देखील ठरवू शकतात. आपण आपलं यश कसं हाताळतो आणि अपयशाला कसं सामोरे जातो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. तुमची कोणतीही कामगिरी तुमच्या विचारांची आणि इतरांशी संवाद साधण्याची पद्धत बदलू शकते का? त्याचवेळी, काही वाईट घटना हे ठरवू शकतं की आता पुढे जाण्याचा मार्ग तुमच्यासाठी बंद आहे. ? '
शिल्पाने पुढे लिहितं की, 'जर तुम्ही तुमच्या मनावर आणि विचारांवर इतक्या आत्यंतिक भावनांमध्येही नियंत्रण ठेवू शकता, तर तुम्ही जगासमोर एक उदाहरण ठेवू शकता की तुम्ही दररोज नव्याने जगता. यश आणि अपयश तुमच्यावर अधिराज्य गाजवू देऊ नका, आज जगा, सगळं काही क्षणिक आहे ... तुम्हीही. शिल्पाची अलीकडील पोस्ट तिच्या मनाची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करू शकते. मात्र, जर शिल्पाच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर शिल्पा शेट्टीने नुकतंच 13 वर्षांनंतर 'हंगामा 2' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. शिल्पाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना, अभिनेत्री शब्बीर खानच्या 'निकम्मा' चित्रपटात दिसणार आहे.