मुंबई : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फसवणूक करणारा महाठग सुकेश चंद्रशेखरची सध्या ईडी चौकशी करत आहे. असे म्हटलं जातं की,  सुकेशचे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींशी संबंध आहेत. सुकेश चंद्रशेखरच्या वक्तव्यानुसार, ईडीने खुलासा केला आहे की सुकेश 2015 पासून श्रद्धा कपूरला ओळखत होता आणि तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) प्रकरणात मदत केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दल बोलताना, चंद्रशेखरने ईडीला सांगितलं की, तो अभिनेता हरमन बावेजाला देखील ओळखतो आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला त्याचा पुढील चित्रपट "कॅप्टन" सह-निर्मितीची योजना आखत आहे.


पती राज कुंद्राच्या सुटकेसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही त्याच्याशी संपर्क साधल्याचं चंद्रशेखर यांच्या वक्तव्यात नमूद करण्यात आलं आहे. यापूर्वी ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची सुकेश चंद्रशेखरसोबतच्या कथित संबंधाबाबत चौकशी केली होती. ED ने सांगितलं की, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना आरोपींकडून लक्झरी कारचे टॉप मॉडेल आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.


दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अलीकडेच सुकेश चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि इतरांविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.