शिल्पा शेट्टी आयुष्याबद्दल मोठा निर्णय घेण्यासाठी गोंधळली? योग्य पर्यायासाठी मागितली मदत
पतीच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा सतत इन्स्टारग्रामवर पोस्ट शेअर करत आहे.
मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यामुळे मोठ्या अडचणींत सापडला होता. पण आता राजला जामीन मंजूर झाला आहे. परंतू अद्यापही राज कुंद्राकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. शिवाय तो सोशल मीडियापासून देखील दूर आहे. पण शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर आपले विचार लोकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. राजचा घरी पोहचल्यानंतर शिल्पाने पोस्ट शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली. आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीने एक किस्सा शेअर केला आहे.
आता देखील शिल्पाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आयुष्यातील मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलताना दिसत आहे. शिल्पाने एका पुस्तकाचं पान स्टोरीमध्ये शेअर केलं आहे. 'व्यक्ती कठीण प्रसंगांना तोंड देत असते, चारित्र्य असलेली व्यक्ती स्वतःवर अवलंबून असते. तो स्वतःपुढच्या संबंधित गोष्टींचा निर्णय घेतो. त्याच्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतो....'
पोस्टमध्ये शिल्पा पुढे म्हणते, 'मला बरीच मते आणि समर्थन मिळाले, परंतु मला समजले की शेवटी आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय घेणे माझ्यावर अवलंबून आहे.' सध्या शिल्पा सतत असेचं पोस्ट शेअर करत आहे. त्यामुळे ती पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या शिल्पाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, पती पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यामुळे शिल्पा देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली. शिल्पाला देखील चौकशीचा सामना करावा लागला. पती तुरूंगात असल्यामुळे शिल्पा देखील सोशल मीडियापासून दूर होती. पण गेल्या काही दिवसांपासून तिने चित्रीकरणाला देखील सुरूवात केली आहे.