मुंबई : लग्न म्हटलं की प्रत्येकाला नव्या आयुष्याची ओढ असते. पण आयत्यावेळेवर लग्न तुटलं तर होणारं दुःख फार मोठं असतं. आभिनेत्री शिल्पा शिंदेच्या जीवनात देखील अशी एक वेळ आली, जेव्हा लग्न होण्याच्या दोन दिवस आधी शिल्पाचं लग्न तुटलं. शिल्पाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहेट. पण तिला लोकप्रियता मिळाली ती म्हणजे तिच्या अंगूरी भाभीच्या भूमिकेमुळे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोफेशनल जीवनातील वादांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिल्पाचे वैयक्तिक आयुष्यही कायम वादग्रस्त राहिलं.  शिल्पा एकेकाळी टीव्ही अभिनेता रोमित राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती.



'मायका' मालिकेच्या सेटवर रोमित राजसोबत शिल्पाची जवळीक वाढली आणि त्यांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेटही केले. 2009 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांचे लग्न निश्चित झाले.


सर्व काही ठीक असताना त्याचं नातं कायमचं तुटलं. दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय एकमेकांच्या संमतीने लग्न घेतला. पहिलं लग्न तुटल्यानंतर तिने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही.


शिल्पा आजही अविवाहीत आहे. ती 44 वर्षांची आहे. अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने 'बिग बॉस 11' मध्ये देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करत ट्रॉफी जिंकली.