मुंबई : गेल्या अनेक वर्षांपूर्वी कलाविश्वाला रामराम ठोकणारी फिटगर्ल अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करायला सज्ज झाली आहे. रूपेरी पडद्यापासून लांब असलेल्या शिल्पाची पाऊले छोट्या पडद्याकडे वळली होती. परंतू आता मात्र शिल्पाला रूपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. शिल्पा तब्बल १३ वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिल्पाच्या पून:पदार्पणाची माहिती दिली.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सब्बीर खान यांच्या चित्रपटात शिल्पा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या 'निकम्मा' चित्रपटात ती एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात ती धमाकेदार स्टन्ट करताना दिसणार आहे. सोनी पिक्चर आणि सब्बीर खान फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'निकम्मा' चित्रपटात शिल्पा शिवाय सोशल मीडिया सेंसेशन शर्ली सेतिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटाच्या काही भागांचे शूटींग सुद्धा पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही गाण्यांचे चित्रिकरण सुद्धा पार पडले आहे.