बलात्काराच्या आरोपात कारावास भोगलेल्या अभिनेत्याची `बिग बॉस 16`मध्ये एन्ट्री?
`बिग बॉस 16` चं घर असणार चर्चेत बलात्काराच्या आरोपात कारावास भोगलेला बॉलिवूड अभिनेता दिसणार आगामी `बिग बॉस`मध्ये?
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना फार कमी कालावधीत यश मिळालं. 2003 साली 'हजारों ख्वाहिशें ऐसी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना वाटलं की बॉलिवूडला अणखी एक नवीन चेहरा मिळाला आणि त्या अभिनेत्याचं नाव होतं शायनी अहूजा (Shiney Ahuja). 'हजारों ख्वाहिशें ऐसी' शायनीला फिल्मफेयर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण हा अवॉर्ड देखील मिळाला. पण मोलकरणीच्या एका आरोपामुळे शायनीच्या करियरला पूर्णविराम लागला. पण आता शायनीच्या करियरला नवी दिशा मिळू शकते.
दरम्यान, शायनी लवकरच 'बिग बॉस 16'मध्ये दिसणार असल्याच कळतं आहे. 'बिग बॉस 16' लवकरच टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. शोचे निर्माते आगामी सीझनसाठी स्टार्सशी संपर्क साधू लागले आहेत.
'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होण्यासाठी सुप्रसिद्ध YouTuber आशिष चंचलानी यांनी देखील ऑफर पाठवण्यात आल्याचं समोर येत आहे. याशिवाय शोच्या निर्मात्यांनी बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजालाही 'बिग बॉस 16' साठी ऑफर पाठवली आहे.
अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप...
2009 साली शायनीच्या मोलकरणीने शायनीवर बलात्काराचा आरोप केला. तेव्हा संपूर्ण देशात याप्रकरणी चर्चा रंगली होती. शायनीला 7 वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली.
पण 2011 साली शयानीची जामिनावर सुटका झाली. भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून त्याने 2012 साली 'घोस्ट' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा पदार्पण केलं. पण तेव्हा तो चाहत्यांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. आता 'बिग बॉस 16' मध्ये झळकल्यानंतर अभिनेत्याच्या करियरला नवी दिशा मिळू शकते का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.