मुंबई : शिरीष कुंदरने नुकताच आपला 48 वा वाढदिवस साजरा केला. शिरीष कुंदरचा जन्म 24 मे 1973 रोजी मंगलोरमध्ये झाला. त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. शिरीष बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक इंजीनिअर होता. तो एका मोटोरोला कंपनीत काम करत होता. चार वर्ष कंपनीत काम केल्यानंतर शिरीषने इंडस्ट्री बदलली आणि बॉलिवूडमध्ये एंन्ट्री घेतली. शिरीषने चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फराह खानसोबत भेट
शिरीष कुंदर आणि फराह खान पहिल्यांदा 'मैं हूं ना'च्या सेटवर भेटले. दोघंही सेटवर नेहमीच भांडायचे. या दोघांचे कधी लग्न होईल असं कोणाला वाटलं देखील नव्हतं. पण अचानक एक दिवस शिरीषने फराहला प्रपोज केलं.


शिरीषला हो म्हणायला फराहने बराच वेळ घेतला पण शेवटी फराहाने देखील होकार दिला. दोघांच्या वयात बराच फरक होता. फराह 32 वर्षांची असताना शिरीष 25 वर्षांचा होता. मात्र या दोघांमध्ये वय आणि धर्म कधीच आलं नाही.


सुमारे सात महिने डेटिंग केल्यानंतर दोघांनी गोव्यात लग्न केलं. २००४मध्ये या दोघांनी तीन वेळा लग्न केलं. पहिलं कोर्ट मॅरेज, दुसरं दक्षिण भारतीय पद्धतीनं लग्न. यानंतर दोघांचा निकाह झाला.


फराह खानसोबत लग्नानंतर शिरीषने 'तीस मार खान' आणि 'जोकर' यासारख्या चित्रपटाची कथाही लिहिली. पण दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. जरी हे दोघे बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. दोघंही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात


एका मुलाखतीत फराहने स्वत: शिरीषच्या प्रपोजलविषयी सांगितलं. फराहाला शिरीषने आपल्या बोलण्यातून कसं प्रेमात पाडलं हे सांगितलं. शिरीष म्हणाला, "डार्लिंग, तुला माझ्याशी लग्न करायचं नसेल, तर दूर जा." मला तुझ्यासोबत माझा वेळ वाया घालवायचा नाही. जर तुम्ही सिरियस असाल तरच आम्ही मी हे संबंध पुढे नेईन आणि लग्न करेन'.


हे दोघंही तीन मुलांचे आन्या, दिवा आणि जारचे पालक आहेत. दोघंही आपल्या मुलांबरोबर सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर करत असतात.