Bigg Boss OTT 3 Vulgarity : रियलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोवर आता अश्लीलता पसरवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. खरंतर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत युट्यूबर अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी क्रितिका मध्य रात्री एका चादरखाली इंटिमेट झाले हे दिसत होते. त्या कथित व्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. या सगळ्याला घेऊन शिवसेना आमदारांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि या शो संबंधीत लोकांना अटक करण्याची मागणी केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या, आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे 'बिग बॉस OTT 3' विरोधात तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी 3' स्पर्धक अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी क्रितीका यांचा इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनीषा कायंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



न्यूज एजेंसी ANI शी बोलताना मनीषा यांनी सांगितलं की 'बिग बॉस ओटीटी 3' हा एक रिअॅलिटी शो आहे. शूटिंग अजूनही सुरु आहे. जे काही सुरु आहे, ते पूर्णपणे अश्लील आहे. यूट्यूब इन्फ्लुएन्सर देखील यात सहभागी होत आहेत आणि आता त्यांनी अश्लीलता पसरवणं सुरु केलं आहे. जो सीन दाखवण्यात आला आहे. त्यासाठी आता आम्ही मुंबई पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि आम्ही त्यांनी या संबंधीत एक पत्र देखील दिलं आहे. रिअॅलिटी शोच्या नावावर अश्लीलता दाखवणं, हे कितपत योग्य आहे. या सगळ्याचा तरुणांवर काय परिणाम होईल?'


मनीषा यांनी पुढे सांगितलं की, 'आम्ही केंद्रात सूचना आणि प्रसारण मंत्र्यांकडे देखील जाऊ आणि त्यांना संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक कायदा आणण्याची विनंती करू. तर आम्ही त्यांना कलाकार आणि शोच्या सीईओलाही अटक करण्यास सांगितले आहे.'


हेही वाचा : 'एक कागद आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवू शकत नाही!' आमिर खानबद्दल किरण रावचं मोठं विधान


खरंतर, नुकत्याच एका एपिसोडमध्ये अरमान आणि त्यांची दुसरी पत्नी क्रितिकामधील काही कोजी मुव्हमेंट्सचे व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा हे कपल लाइव शोमध्ये इंटिमेट होत असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. दरम्यान, अरमानची पहिली पत्नी पायलनं दावा केला की 'हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडीओ शेअर करत दावा केला आहे की हा व्हिडीओ अरमान आणि क्रितीकाचा आहे, मी त्याला हात जोडून विनंती करते की असं करणं बंद करा. कारण हा व्हिडीओ एडिटेड आहे. मी बिग बॉसच्या घरात राहिली आहे आणि त्यामुळे हे सांगू शकते की या व्हिडीओत दाखवण्यात आलेला लॅम्प हा बिग बॉसच्या घरात नाही आहे. चादर आहे ती देखील वेगळी आहे. जे लोक त्या घराच्या आत आहेत किंवा तिथून बाहेर आले आहेत. त्यांना लगेच कळेल की ही फेक क्लिप आहे.'