Jhalak Dikhhla Jaa Shiv Thakare Elimination : मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने चर्चेत आला. त्यानंतर तो हिंदी बिग बॉस 16 या कार्यक्रमाच्या पर्वातही झळकला. यामुळे शिव ठाकरेच्या चाहता वर्ग हा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे हा झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या 11 व्या पर्वात झळकत आहे. लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच शिव ठाकरेला या कार्यक्रमातून एक्झिट घ्यावी लागली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. 


टॉप 5 स्पर्धकांची नावं समोर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झलक दिखला जा 11' हा डान्स रिअॅलिटी शो अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही आठवड्यात या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी या कार्यक्रमातील टॉप 5 स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. या कार्यक्रमाच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये मनीषा रानी, धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्र या कलाकारांची नाव पाहायला मिळत आहे. पण यात शिव ठाकरेचे नाव नसल्याचे चाहत्यांना धक्का बसला आहे.


चाहत्यांना मोठा धक्का 


'झलक दिखला जा 11'च्या महाअंतिम सोहळ्याआधी शिव ठाकरे हा या कार्यक्रमातून बाहेर पडला आहे. त्याच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शिव ठाकरे बाहेर पडल्याने अनेक चाहते नाराज झाले आहेत. तर काहीजण यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. 



"खूप गोष्टी शिकलो"


या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शिव ठाकरेचा झलक दिखला जा या कार्यक्रमाचा प्रवास पाहायला मिळत आहे. यावेळी शिवने प्रतिक्रियाही दिली. "झलक दिखला जा या कार्यक्रमात येणं हे माझं स्वप्न होतं. मी खूप आनंदात आहे. मी या कार्यक्रमातून खूप गोष्टी शिकलो आहे", असे शिव ठाकरे म्हणाला. 


दरम्यान 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 3 मार्च 2024 रोजी रंगणार आहे. शिव ठाकरेच्या एलिमिनेशननंतर आता मनीषा रानी, धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्र हे कलाकार टॉप 5 स्पर्धक ठरले आहेत. त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.