`एका मुलानं मला...`, Shivali Parab नं `त्या` प्रपोजल विषयी केला खुलासा
Shivali Parab Viral Video: शिवाली परबनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रपोजलविषयी खुलासा केला आहे. मुलानं प्रपोज केल्यानंतर तिला कसं वाटलं हे तिनं सांगितलं. शिवाली ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहते. शिवालीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab: छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून कलाकारांना वेगळी ओळख मिळाली. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून बसला आहे. या कार्यक्रमातील कलाकरांनी खूप मेहनत करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. याच मालिकेतील सगळ्यांची लाडकी आणि कोहली कुटुंबाची सदस्य शिवाली परब ही चांगलीच लोकप्रिय आहे. आता शिवालीनं तिच्या पहिल्या प्रपोजल विषयी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शिवाली परबनं खुलासा केला होता की तिचं बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानवर क्रश आहे. तर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला शाळेत एका मुलानं प्रपोज करण्याविषयी सांगितलं आहे. शिवाली ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "मी आतापर्यंत कधीही कोणाला प्रपोज केलेलं नाही. पण शाळेत असताना मला एका मुलाने प्रपोज केलं होतं. त्यावेळी मी आता जशी बिनधास्त आहे तशी मी आधी नव्हते. शाळेत असताना मी खूप घाबरट होते. शाळेत असताना मला एका मुलानं विचारलं होतं पण माझ्या शामळू स्वभावामुळे मी त्याला काहीही प्रतिक्रिया दिली नाही.”
शिवालीला खरी लोकप्रियता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधूनच मिळाली. तर शिवालीला या कॉमेडी शोमध्ये नम्रता संभेरराव घेऊन आली होती. तिच्यामुळे शिवालीला हास्यजत्रेत संधी मिळाली. बदलापुरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील संधीमुळे शिवालीला हे काम मिळालं होतं याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.शिवालीचं काम पाहून नम्रतानं हास्यजत्रेसाठी शिवालीचा रेफरन्स दिला होता. हे सांगत ती म्हणाली, मला एक दिवस समोरून कॉल आला आणि मला सांगितलं की हास्यजत्रेसाठी नम्रता संभेरावने तुमचा रेफरन्स दिला आहे, त्यावेळी हे ऐकूण तिला खूप आनंद झाला होता.
हेही वाचा : "अतिआत्मविश्वासामुळे नडला", असं का म्हणताहेत Naseeruddin Shah?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवाली परब ही 'म्याड केलंस तू' या म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली होती. या गाण्यात 'म्याड केलंस तू' या शब्दात त्यांच्या प्रेमाची कबूली देत आहे. तर शिवालीच्या या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. शिवालीला या गाण्यात पाहून तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. या गाण्यात शिवालीसोबत खानदेशातील विशाल राठोड दिसत आहे. सीएम राठोड यांनी गाण्याची निर्मिती केली आहे. शिवाली ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिच्या कोहली या स्किटसाठी खूप ओळली जाते. तिच्या त्या स्किटवर अनेक सेलिब्रिटींनी रिल्स बनवले होते.